Belagavi

सुळेभावी दुहेरी हत्याकांडाला इंस्टाग्राम रौडीझम कारणीभूत !

Share

सुळेभावी दुहेरी हत्याकांडाला सुळेभावीतील इंस्टाग्राम रील्स जबाबदार असल्याचा संशय आहे. कारण खून झालेले दोघेही इंस्टाग्रामवर रौडीझम रील्स पोस्ट करत होते. यामुळे चिडलेल्या मारेकऱ्यांनी त्यांचा काटा काढल्याचा संशय आहे. डबल मर्डरचे हे कारण सध्या खूप चर्चेत आहे.

होय, खून झालेल्या रणधीर उर्फ महेश मुरारीने हातात तलवार घेऊन रील केली. त्यांने ‘उग्रम’ चित्रपटाचे डायलॉग रीलसोबत पेस्ट केले होते. खून झालेल्या प्रकाश पाटील यानेही हातात चाकू घेऊन रील केले होते. चाकू धरून केजीएफ चित्रपटाच्या डायलॉगसह त्याने रील बनवली होती. महेश, प्रकाश कन्नड रौडीझम चित्रपटातील पात्रांची नक्कल रीलमध्ये करायचे. त्यांच्या या इंस्टाग्राम रीलने मारेकऱ्यांना आपल्याला आव्हान दिल्याचा राग आला.


खून झालेला महेश आणि खून केलेला शशिकांत मिसाळे हे खरे तर एकाच टोळीतील मित्र होते. क्षुल्लक कारणावरून दोन्ही मित्र कट्टर शत्रू झाले. सुळेभावी गावात महेश आणि शशिकांत गटात वर्चस्व वाढवण्यासाठी आटापिटा सुरू झाला. महेश हा गोकाकच्या टायगर गँगशी संबंधित होता. टायगर ग्रुपच्या सगळ्यांना अटक झाल्यानंतर महेश सुळेभावी येथे राहण्यास आला होता. दरम्यान, वादावर तोडगा काढण्यासाठी बोलावून घेऊन शशिकांत मिसाळे टोळीने महेश मुरारी आणि प्रकाश पाटील यांचा तीक्ष्ण हत्याराने वार करून निर्घृण खून केला. गुंडगिरीप्रधान चित्रपट पाहून तरुणांची दिशाभूल होते हेच यावरून स्पष्ट झाले आहे.

टोळी तयार करून वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी धडपडणाऱ्या दोन युवकांचा निर्घृण खून झाला, तर खून करणाऱ्या शशिकांत मिसाळे टोळीला तुरुंगात टाकण्यात आले. पुढील तपास मारिहाळ पोलीस करत आहेत. आमची काळजी ही आहे की, सोशल मीडियावर पोस्ट करण्यापूर्वी प्रत्येकाने सावधगिरी बाळगली पाहिजे आणि केवळ अशातऱ्हेच्या वादग्रस्त, आव्हानात्मक पोस्ट करून आपला जीव धोक्यात घालू नका.

Tags:

belgaum crime sulebhavi double murder