हुक्केरी शहरांमध्ये आजपासून उरूस सुरू होत असल्याच्या पार्श्वभूमीवर विविध धर्माच्या नेत्यांची शांतता समिती बैठक हुक्केरी पोलीस ठाण्यात पार पडली.

नगराध्यक्ष ए. के. पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत बोलताना पोलीस निरीक्षक रफिक तहसीलदार म्हणाले की, हुक्केरी शहरामध्ये पैगंबर जयंती, मसाबी उरूस, गजबरवाडी, पीरपन्ना, दादाकलाम, करीम पाशा, जंगलसाब, बाबासाहेब उरूस या उरूस शांततेत, भक्तिभावाने साजरे करावे.

युवकांनी दुचाकी वाहनांवरून कर्णकर्कश आवाज न काढता शांततेत जुलूस काढावा. हिंदू-मुस्लीम बांधवांनी एकोप्याने सण साजरे करावेत, अशी सूचना त्यांनी केली.
मुस्लीम नेते मोमीनदादा, शिवराज नाईक यांनी सल्ले व सूचना दिल्या. यावेळी शहरातील हिंदू मुस्लिम नेते उपस्थित होते.


Recent Comments