भाजपला राहुल गांधी निरुपयोगी म्हणून दाखवण्याची भाजपला गरज नाही. जनतेनेच त्यांना निरुपयोगी ठरवले आहे, अशी उपरोधिक टीका केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी केली.
हुबळी शहरातील इंदिरा ग्लास हाऊसमध्ये महर्षी वाल्मिकी यांच्या पुतळ्याला महर्षी वाल्मिकी जयंतीनिमित्त पुष्पहार अर्पण केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना केन्दिरी मंत्री जोशी म्हणाले की, देशभरात काँग्रेसचे पानिपत झाले आहे. भारत जोडोमधून भाजपला कोणताही धक्का बसणार नाही. त्याऐवजी राहुल गांधी आणि सिद्धरामय्या यांच्या प्रकृतीत सुधारणा होऊ शकते, असे टोला त्यांनी हाणला.
महर्षी वाल्मिकींनी जगाला सर्वोत्तम ग्रंथ दिला. वाल्मिकींनी खऱ्या घटनेचे रामायणात चित्रण केले. सरकारने अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या आरक्षणात वाढ केली हा ऐतिहासिक निणर्य आहे. यातून भाजपने हा गरीब, वंचित आणि दलितांचा समर्थक पक्ष असल्याचे सिद्ध केले आहे असा दावा जोशी यांनी केला.
काँग्रेस दलितांना व्होट बँक म्हणून ओळखत होती. काँग्रेसने मागासवर्गीयांचे कल्याण केले नाही. त्यामुळे दलितांची अवस्था दयनीय आहे. आता आरक्षणात वाढ करून राज्य सरकारने मोठे काम केले आहे. यासाठी जबाबदार असलेले मुख्यमंत्री, मंत्री आणि स्वामीजींचे अभिनंदन करतो, असे केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितले.


Recent Comments