Belagavi

नागपूर अधिवेशनात सुद्धा सीमाप्रश्नी विषय मांडणार ; आमदार निलेश लंके

Share

राष्ट्रवादीचे पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी बेळगावला सदिच्छा भेट दिली यावेळी त्यांनी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती कार्यालयाला भेट देत समितीच्या कार्यकर्त्यांशी संवाद सादला.

यावेळी युवा समिती वतीने निलेश लंके याना सीमाप्रश्नी माहिती देण्यात आली आणि सीमावसीयांच्यावर होणाऱ्या अत्याचाराची आणि भाषिक सक्तीची माहिती देण्यात आली.
यावेळी निलेश लंके यांनी कार्यकर्त्याना संबोधित करताना आजपर्यंत मी या प्रश्नाशी अवगत नव्हतो पण बेळगावला आलो आणि येथील मराठी भाषिकांच्या होणाऱ्या अत्याचाराची माहिती मिळाली आणि मन पिळवटून गेले. पण आता यापुढे सीमाप्रश्नी सदैव आपल्या पाठीशी राहून हा प्रश्न तडीस गेल्याशिवाय शांत बसणार नाही आणि नागपूर अधिवेशनात सुद्धा हा विषय मांडणार असल्याचे सांगितले. येथील मराठी शाळा आणि भाषा टिकवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असून पुढील वर्षी युवा समितीच्या उपक्रमाला सुद्धा शैक्षणिक साहित्य देण्याचे जाहीर केले. यावेळी युवा समिती अध्यक्ष यांनी सीमाप्रश्नी संघर्ष हे पुस्तक भेट दिले.

यावेळी कार्याध्यक्ष सुरज कुडूचकर, उपाध्यक्ष अंकुश केसरकर, सचिन केळवेकर, सरचिटणीस श्रीकांत कदम, माजी उपमहापौर संजय शिंदे, नागसेवक शिवाजी मंडोळकर, श्री रामचंद्र मोदगेकर, प्रशांत भातकांडे, राजू कदम, प्रवीण रेडेकर, आकाश भेकने, नागेश बोबाटे, प्रतीक पाटील, सिद्धार्थ चौगुले, जोतिबा पाटील, आनंद पाटील,किरण मोदगेकर, सुरज कणबरकर, प्रथमेश मनुरकर, महेश मनुरकर उमेश डुकरे आदी उपस्थित होते.

Tags: