Belagavi

यत्नाळांबाबत आपण नाही हायकमांड निर्णय घेईल : केंद्रीय मंत्री नारायणस्वामी

Share

येडियुरप्पा यांच्याविरोधात जाहीरपणे वक्तव्ये करणाऱ्या आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांच्याबाबत आपण कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही. मात्र हि बाब हायकमांडच्या निदर्शनात असल्याचे मत केंद्रीय सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्री नारायणस्वामी यांनी व्यक्त करत आमदार यत्नाळांविरोधात नाराजी व्यक्त केली.

बेळगाव जिल्ह्यातील निपाणी परिसरात केंद्र सरकारच्या वायोशरी योजनेतील लाभार्थ्यांना विविध सुविधांचे वितरण केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. आमदार यत्नाळांकडून सातत्याने जाहीरपणे होत असलेल्या वक्तव्यांबाबत त्यांनी नाराजी व्यक्त करत यावर आपण चर्चा न करता हि बाब हायकमांडच्या निदर्शनात आल्याचे ते म्हणाले.

हायकमांडचे या सर्व गोष्टींकडे लक्ष आहे शिवाय प्रदेशाध्यक्षांच्या निदर्शनात देखील हि बाब आली असून प्रत्येकाने प्रत्येकाचा आदर करून मानवी मूल्ये जोपासणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. एससी-एसटी समाजाला दिलेल्या वाढीव आरक्षणासंदर्भात प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी आरक्षण वाढीचा धाडसी निर्णय घेतला असून या निर्णयाचे मी अभिनंदन करतो. काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी असा धाडसीपणा दाखविला नाही.

सदर प्रस्तावाबाबत मंत्रिमंडळात निर्णय घेऊन प्रस्ताव सभागृहात मांडण्यात आला. सभागृहात या मुद्द्यावर कायदेशीर समस्या आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर चर्चा करण्यात आली. आज वंचित वर्गाला आरक्षणाची गरज आहे. मुख्यमंत्र्यांनी वाढीव आरक्षणाचा निर्णय घेऊन धाडस दाखविले याचे आपल्याला कौतुक असून सदाशिव आयोगाच्या अहवालाच्या अंमलबजावणीसाठी काँग्रेसच्या मंत्र्यांनी फाईल आणली परंतु वाढीव आरक्षणाचा निर्णय त्यांना घेता आला नसल्याने सांगत नारायणस्वामींनी काँग्रेसवर निशाणा साधला

Tags: