Belagavi

सराफाला लुटणाऱ्या चौकडीला निपाणी पोलिसांकडून बेड्या

Share

सराफाला लुटणाऱ्या चौकडीला निपाणी पोलिसांनी बेड्या ठोकण्यात यश मिळवले आहे. ५ लाख ४० हजार रुपये किमतीचे सोने-चांदीचे दागिने लुटल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

प्रदीप अनिल कांबळे, वय २५, अवधूत भाऊसाहेब कोळी, वय २५, दोघेही रा. बेडकिहाळ, अक्षय अशोक कोंडिगेरी, वय २९, रा. मांगूर आणि पंकज संजू कोळी, वय २३, रा. सदलगा अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या चौकडीने निपाणी तालुक्यातील भिवशी गावच्या हद्दीत ८ एप्रिल २०२२ रोजी सायंकाळी धोंडीराम विष्णू कुसाळे, रा. मांगूर या सराफाला लुटले होते. कुसाळे सराफी दुकान बंद करून घरी जात असताना मोटरसायकल आडवी घालून त्यांना पाडून त्यांच्याकडील दागिन्यांची बॅग घेऊन त्यांनी पोबारा केला होता. ५ लाख ४० हजार रुपये किमतीचे सोन्याचे ७५ ग्रॅम व चांदीचे २.५ किलो वजनाचे दागिने त्यांनी लुटले होते.

या प्रकरणी चिक्कोडी डीएसपी बसवराज यलीगार यांच्या मार्गदर्शनाखाली निपाणीचे सीपीआय संगमेष शिवयोगी यांच्या नेतृत्वाखालील तपास पथकाने कसून तपास करून या चारही आरोपीना बेड्या ठोकल्या आहेत.

Tags: