सौंदत्ती येथील हर्षा साखर कारखान्यात १०० के एल क्षमतेच्या इथेनॉल युनिटच्या बॉयलरचा शुभारंभ तसेच यंदाच्या ऊस गळीत हंगामासाठी ऊस कॅरियरचेही पूजन करण्यात आले.

हुलीमठाचे श्री उमेश्वर महास्वामी संभय्यनवरमठ यांच्या सानिध्यात कारखान्याला सर्वाधिक ऊस पुरवठा केलेल्या १० शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
२०२१-२२ या सालात कारखान्याला ऊस पुरवठा केलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला प्रतिटन १०० रुपये अधिक देण्यात येणार आहेत, अशी घोषणा कारखान्याच्या अध्यक्षा आणि आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी एका परिपत्रकाद्वारे केली आहे. यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला यंदा २७०० रुपये याप्रमाणे दर देण्यात येणार आहे. केंद्र सरकारने २०२१-२२ या वर्षासाठी निश्चित केलेल्या एफपीआर पेक्षा १९८ रुपये अधिक दर देण्यात येणार आहे. यावर्षीदेखील केंद्र सरकारच्या एफपीआर नुसार योग्य दर देण्याचा भरवसा देण्यात आला असून अधिकाधिक ऊस पुरवठा करण्याचे आवाहन शेतकऱ्यांना करण्यात आले आहे.
यावेळी साखर कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक आणि विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी आणि संचालक मृणाल हेब्बाळकर, या भागातील ऊस उत्पादक शेतकरी, ज्येष्ठ अधिकारी सदाशिव थोरात, एन एम पाटील, यु सी चौकिमठ आदींसह इतर मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments