Belagavi

मुलीच्या मृत्यूला न्याय द्या : असहाय्य बापाची आर्त साद !

Share

बेळगाव तालुक्यातील शिंदोळी येथे ५ ऑक्टोबर रोजी एका गृहिणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीसह त्याच्या कुटुंबीयांवर कारवाई करण्याची मागणी मृत महिलेच्या वडिलांनी केली आहे.

होय, शिंदोली येथे 5 ऑक्टोबर रोजी अनिता रमेश लोहार या महिलेने पतीच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी मयत महिलेच्या वडिलांनी मारिहाळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. यावेळी मारिहाळ स्टेशनच्या सीपीआयनी घटनास्थळी भेट देऊन तपास केला, त्यानंतर अनिताचा पती रमेश लोहार आणि वडील अशोक लोहार यांना अटक करण्यात आली. मात्र अन्य तीन आरोपींना पोलिसांनी अद्याप अटक केलेली नाही. मृत अनिता आणि रमेश यांचा तीन वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता.

त्यानंतर काही दिवस त्यांचे कुटुंब चांगले चालले होते. त्यानंतर सासू, सासरे, नणंद आणि नणंदेच्या पतीने माहेराहून हुंडा आणण्यासाठी अनिताचा शारीरिक व मानसिक छळ सुरु केला होता. यातूनच अनिताने आत्महत्या केल्याचा अनिताच्या वडिलांचा आरोप आहे. या आत्महत्येप्रकरणी मारिहाळ पोलिसांनी अनिताचा पती रमेश लोहार आणि सासरा अशोक मल्लाप्पा लोहार यांना यापूर्वीच अटक केली आहे. मात्र सासू शारदा लोहार, नणंद रेश्मा प्रशांत सुतार आणि तिचा पती प्रशांत शिवाजी सुतार यांना अटक करण्यात आलेली नाही.

आपल्या मुलीच्या मृत्यूला न्याय मिळवून देण्यासाठी पोलीस ठाण्याच्या पायऱ्या झिजवणारे अनिताचे वडील मधुकर सुतार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागूनही न्याय मिळाला नाही. शेवटी, त्यांनी आमच्या इनन्यूजच्या कार्यालयात येऊन आपले गाऱ्हाणे मांडले. सर्व आरोपींचे मोबाईल कॉल डिटेल्स तपासून त्यांना तत्काळ अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी त्यांनी केली.

प्रेमाने वाढवलेल्या आपल्या मुलीने अशा प्रकारे आत्महत्या केल्याने पालक कमालीचे संतापले आहेत. तसेच मृत अनिताला २० महिन्यांचा मुलगा आहे. आता या तान्हुल्याने आपली आई गमावली आहे आणि ते अनाथ आहे, ही मोठी शोकांतिका आहे.

Tags:

daughter-suicide-father-roaming-for-justice