कलियुगात काय काय पाहावे लागत आहे याची कल्पनाच न केलेली बरी..आजपर्यंत दूध देणाऱ्या प्राण्यांमध्ये केवळ म्हैस, गाय, शेळी, मेंढी अशा प्राण्यांचा समावेश होता. मात्र आता चक्क मेंढ्याने दूध दिल्याची आश्चर्यचकित करणारी घटना जमखंडी येथे घडली आहे.
जमखंडीनगर येथील टीचर्स कॉलनी येथील मेंढा दूध देत असल्याचा व्हिडीओ वायरल झाला असून, या गोष्टीमुळे नागरीकातून आश्चर्य व्यक्त होत आहे. परशुराम भजंत्री यांच्याकडे असलेला मेंढा दररोज एक कप दूध देत आहे. मेंढपाळ असलेल्या परशुराम भजंत्री यांच्याकडे भरपूर शेळ्या – मेंढ्या आहेत. यापैकीच एका मेंढ्याने दूध देऊन सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. निसर्गाच्या या आगळ्या वेगळ्या आश्चर्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वायरल झाला आहे.
यासंदर्भात मेंढपाळ परशुराम भजंत्री यांचे मित्र हणमंत गोल्लर यांनी माहिती देताना सांगितले, आम्ही दोघंही शेळ्या मेंढ्या पाळतो. गेल्या तीन वर्षांपासून दररोज हा मेंढा दूध देत असून हि बाब आपल्यालाही विचित्र आणि आश्चर्यजनक वाटल्याचे ते म्हणाले.
निसर्गाचे चक्र ठरलेले असूनही कलियुगात पाहाव्या लागत असलेल्या अशा अनेक गोष्टी खरोखरच आश्चर्यचकित करणाऱ्या ठरत आहेत. जमखंडी येथील हि बाब तर अगदीच विचित्र अशी वाटणारी असून हि बाब सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे.


Recent Comments