सार्वजनिक सार्वजनिक शिक्षण खाते आणि बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय शालेय रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप आणि निवड चाचणी २०२२ चे आयोजन करण्यात आले होते दिनांक 4 ऑक्टोबर 2022 रोजी केएलई सोसायटीच्या लिंगराज कॉलेज कॅम्पसमध्ये असलेल्या स्केटिंग रिंकमध्ये 14 वर्षांखालील आणि 17 वर्षांखालील मुले आणि मुली अशा दोन गटात ही स्पर्धा घेण्यात आली.
या चॅम्पियनशिपमध्ये बेळगाव जिल्ह्यातील सुमारे 40 स्केटर्स सहभागी झाले होते.स्पर्धेचा निकाल असा : क्वाड स्केटिंग 14 वर्षाखालील मुले : कृष्णा बस्तवाडी 2 सुवर्ण, सोहम कंग्राळकर 2 रौप्य, ऋत्विक दुभाशी 2 कांस्य
14 वर्षाखालील मुली : जान्हवी तेंडुलकर 2 सुवर्ण, शर्वरी दड्डीकर 2 रौप्य, सई पाटील 2 कांस्य.
17 वर्षांखालील मुले : श्री रोकडे 2 सुवर्ण, साई समर्थ आजना 2 रौप्य, प्रणव चोगुले 2 कांस्य.
17 वर्षांखालील मुली : विशाखा फुलवाले 2 सुवर्ण, सानिका कंग्राळकर 2 रौप्य.
14 वर्षाखालील मुलांचे इनलाइन स्केटिंग : प्रीतम नीलाज 2 सुवर्ण, सर्वेश कुदळे 2 रौप्य, साईराज मेंडके 2 कांस्य.
14 वर्षाखालील मुली : रश्मिता अंबिगा ३ सुवर्ण,
17 वर्षांखालील मुले : देवेन बामणे 3 सुवर्ण,
17 वर्षांखालील मुली : करुणा वाघेला ३ सुवर्ण, तुलसी हिंडलगेकर 3 रौप्य.
ही स्पर्धा आणि निवड चाचणीचे उद्घाटन बेळगाव डीडीपीआय कार्यालयाचे डीपीईओ डी. एस. डीग्रज यांच्या हस्ते झाले. या वेळी स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, योगेश कुलकर्णी, मंजुनाथ मंडोळकर, विठ्ठल गगणे, सक्षम जाधव उपस्थित होते.
Recent Comments