Belagavi

सहारा फौंडेशनतर्फे मोफत नेत्रतपासणी शिबीर

Share

बेळगावात सहारा फौंडेशनतर्फे बेळगावात तिसऱ्यांदा मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

होय, बेळगावच्या वीरभद्रनगर येथील उर्दू शाळेत सहारा फौंडेशनने आयोजित केलेल्या मोफत नेत्र तपासणी शिबिरात अनेक लोकांनी येऊन आपले डोळे तपासून घेतले. त्याचवेळी सहारा फौंडेशनचे सलमान मकानदार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, आम्ही नेत्र तपासणी, चष्मे वाटप आणि मोतीबिंदूचे ऑपरेशन मोफत करत आहोत. ते शासनाच्या योजनेंतर्गत केले जात आहे.

हे तिसरे शिबीर आहे, आधी उज्वल नगरात, नंतर खंजर गल्लीत आणि आज वीरभद्रनगर येथील उर्दू शाळेत तिसरे शिबीर भरवले आहे. आतापर्यंत 1500 लोकांची नेत्र तपासणी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे आम्ही 450 हून अधिक लोकांना चष्म्याचे वाटप केले आहे.
उज्वल नगर येथील क्लिनिकमध्ये आम्ही फक्त 10 रुपयांमध्ये तपासणी, औषध आणि इंजेक्शन देत आहोत, त्याचा सर्वानी लाभ घ्यावा असे त्यांनी सांगितले.

सहारा फौंडेशनच्या कामाला सहकार्य करणाऱ्या नगरसेविका रेश्मा भैरकदार म्हणाल्या की, ज्या गरीब लोकांना तपासणीसाठी रुग्णालयात जाता येत नाही, त्यांना सहारा फौंडेशन आरोग्य सेवा देत आहे. त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे. परिसरातील गरीब लोकांनी त्यांच्या सेवेचा लाभ घ्यावा, असे त्यांनी सांगितले.

यावेळी जिल्हा रुग्णालय व नेत्र रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी शिबिरात आलेल्या नागरिकांची तपासणी केली. या शिबिराच्या यशस्वीतेसाठी सहारा फौंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Tags:

sahara foundation eye test