Khanapur

कोडचीवाड गावाला आदर्श गाव बनविण्याचा संकल्प : प्रमोद कोचेरी

Share

खानापूर तालुक्यातील कोडचीवाड येथे आजी माजी सैनिक आणि शालेय विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.

यावेळी आयोजित कार्यक्रमात बोलताना भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी म्हणाले, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम आयोजिल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अधिक प्रेरणा निर्माण होईल. कोडचीवाड गाव हे भविष्यात आदर्श गाव व्हावे, यासाठी गावात विविध विकासकामे करण्यात येत आहेत. गावात मंदिर उभारणीसाठी धर्मादाय विभागाच्या मंत्री शशिकला जोल्ले यांनी यापूर्वीच २५ लाख तर माजी आमदार यांनी १० लाख देण्याचे जाहीर केले आहे. कोविडमुळे मंदिर उभारणीला विलंब झाला असून मंदिर उभारणीसह गावाला आदर्श गाव बनवण्याचा आपला संकल्प असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रमोद कोचेरी बोलताना म्हणाले, देशाची आर्थिक स्थिती सुधारत आहे. भविष्यात भारतात जगात पहिल्या क्रमांकावर येईल आणि सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या एक मजबूत राष्ट्र म्हणून उदयास येईल. देशात सुरु असलेला अन्याय आणि अत्याचार संपविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी श्रीकृष्णाप्रमाणे कार्य करत असल्याचे ते म्हणाले.

या कार्यक्रमास अनेक मान्यवर, माजी सैनिक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Tags:

pramod kocheri