बेळगावमधील शिवबसव नगर येथील नवीन श्री शिवबसव खानावळ आणि केटरर्सचे उद्घाटन कारंजी मठाचे परमपूज्य गुरुसिद्ध महास्वामी यांच्या हस्ते झाले.
दसरा सणानिमित्त शहरातील श्री सिद्धरामेश्वर ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशन्ससमोर बुधवारी श्री शिवबसव खानावळ आणि केटरर्सचे शानदार समारंभात उद्घाटन करण्यात आले. यावेळी उद्घाटन करून बोलताना श्री गुरुसिद्ध महास्वामी सध्याची पिढी चायनीज आणि फास्ट फूडकडे जास्त आकर्षित होत आहे. त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होत आहेत. अशा काळात, बसय्या हिरेमठ कुटुंब लोकांना स्वादिष्ट, स्वच्छ, शाकाहारी जेवण देत आहे. त्याचप्रमाणे त्यांनी शहरातील सर्व भागातील ग्राहकांना उत्तम जेवण पुरवावे अशा शुभेच्छा दिल्या.
नंतर मालक, बसय्या हिरेमठ यांनी सांगितले की, आम्ही शाकाहारी जेवणाव्यतिरिक्त केटरिंग सेवा देखील देत आहोत. आम्ही कोणत्याही लग्नासाठी, बैठकीसाठी, समारंभासाठी नीटनेटकी दर्जेदार केटरिंग सेवा देतो.
उद्घाटन कार्यक्रमात सहभागी झालेल्या मान्यवरांची यावेळी भाषणे झाली, या परिसरात अनेक महाविद्यालये आहेत. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना आणि लोकांना शाकाहारी जेवण हवे असल्यास लांब जावे लागत होते. त्यामुळे येथील लोकांना या रेस्टॉरंटमध्ये येऊन उत्तम जेवण करता येईल, असे त्यांनी सांगितले.
यावेळी मंजुळा आणि राचय्या हिरेमठ, गंगव्वा आणि चन्नबसय्या मठपती दांपत्य व अन्य उपस्थित होते.


Recent Comments