खानापूर तालुक्यातील पारिशवाड गावातील एका तरुणाने मलप्रभा नदीत उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या आजीला वाचवून सर्वांसमोर आदर्श निर्माण केला आहे.

खानापूर तालुक्यातील बसापूर गावातील बाळम्मा नावलगी नावाच्या 75 वर्षीय आजीने पारिशवाडजवळील मलप्रभा नदीत उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. यावेळी तेथे असलेल्या एजाज नाझील या तरुणाने आपल्या जीवाची पर्वा न करता नदीत उडी घेऊन आजीचा जीव वाचवला. प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार केल्यानंतर आजीला पुढील उपचारासाठी बेळगाव जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले.
एजाजच्या या साहसी आणि मानवतावादी कार्याचे गावकऱ्यांनी कौतुक केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते अल्पाज मारिहाळ, संतोष कलमठ, अकलाक सनदी, मोसीन मारिहाळ, ताजदार, विठ्ठल आदी उपस्थित होते.


Recent Comments