Hukkeri

हुक्केरीत पालखी सोहळ्याने दसरा उत्सवाची सांगता

Share

हुक्केरी येथील श्री चंद्रशेखर महास्वामी यांच्या आडवी पालखी महोत्सवाने हिरेमठाच्या नवरात्र दसरा महोत्सवाची सांगता झाली.

शहरातील गुरुशांतेश्वर हिरेमठाचे मानकरी आणि भक्तांनी फुलांनी सजवलेल्या आडव्या पालखीतून चंद्रशेखर महास्वामीजींचे कृषी संशोधन केंद्राकडील सीमोल्लंघन स्थळी आगमन झाले. तेथे सोन्याचे किरीट घालून ते विराजमान झाले. अग्नी होम, अष्टदिशा आणि बन्नीच्या झाडाची पूजा केली. स्वामीजींच्या पाद्यपूजेनंतर करी वाहून सोने वाटपाचा कार्यक्रम पार पडला.
यावेळी भक्तांना संबोधित करताना चंद्रशेखर स्वामीजी म्हणाले की, नवदुर्गेची नऊ दिवस पूजा करून आज विजयोत्सव साजरा केला जात आहे.

नंतर वाद्यसंगीतासह आडवी पालखी श्री मठाकडे रवाना झाली. यावेळी मठातील दरबारी सेवक, दावेदार व भाविक शेकडोच्या संख्येने सहभागी झाले होते.

Tags:

hukkeri dasara mahotsava