Belagavi

बेळगावमध्ये ईद मिलाद निमित्त कुराण पठण स्पर्धा

Share

ईद मिलाद निमित्त बेळगावमध्ये अंजुमन संस्थेतर्फे कुराण पठण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यातील २३ मदरशाच्या विद्यार्थ्यांनी यात भाग घेतला.

अंजुमन संस्थेतर्फे बेळगावमध्ये ईद मिलादनिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. ईद मिलादच्या औचित्याने कुराण पठण स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेत जिल्ह्यातील २३ मदरशाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी सुरेल आवाजात कुराण पठण करून सर्वांची दाद मिळविली.

यावेळी अंजुमन संस्थेचे अध्यक्ष राजू सेठ बोलताना म्हणाले, प्रत्येक समाजातील पालकांनी त्यांच्या मुलांना आपल्या धर्माची जाणीव करून दिली पाहोजे. मुलांना धार्मिक ज्ञान असेल ते योग्य मार्गावर जाऊ शकतात. सुशिक्षित होऊ शकतात आणि चांगले भविष्यही घडवू शकतात. याच अनुषंगाने अंजुमन संस्थेचे मुलांसाठी विविध कार्यक्रम आयोजित केले असल्याचे ते म्हणाले.

यावेळी अनुजांना संस्थेचे सचिव समीउल्ला माडीवाले, न्यायाधीश हाफिज जैनुल्ला, अबिद्दीन, हाफिज नजरुल्ला, शेख रजा, खारी अल्ताफ आणि इतर अंजुमन सदस्य उपस्थित होते.

Tags:

religious programme on eve of eid milad