प्रियकरासह पळून गेलेली आपल्या अल्पवयीन मुलीचा पोलिसांकडूनही शोध न लागल्याने वडिलांनी आत्महत्या केल्याची घटना विजापूर जिल्ह्यात घडली आहे.
विजापूर जिल्ह्यातील बसवनबागेवाडी तालुक्यातील भैरवदगी गावात परिवहन विभागातील कर्मचारी गंगाधर बडिगेर यांनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. महिनाभरापूर्वी गंगाधर यांची अल्पवयीन मुलगी प्रियकरासह पळून गेली होती. पोलिसात फिर्याद देऊनही तिचा शोध न लागल्याने त्यांनी नैराश्यातून गावाबाहेरील कालव्यात उडी घेऊन आत्महत्या केली. त्याच गावातील संतोष पट्टेद नावाच्या तरुणासोबत ती घरातून निघून गेली होती. कितीही शोधाशोध करूनही मुलगी सापडली नाही, या पार्श्वभूमीवर त्यांनी बसवनबागेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. तक्रार करूनही गंगाधर बडिगेर यांची अल्पवयीन मुलगी अद्याप सापडलेली नाही.
त्यामुळे गंगाधर बडिगेर नाराज झाले होते. त्यांनी अनेकवेळा पोलिस स्टेशनमध्ये पळापळ करूनही काही फायदा झाला नाही. पळून गेलेली मुलगी पोलिसांनाही सापडली नाही. यामुळे अपमानित झालेल्या गंगाधर यांनी आत्महत्या करून आपले जीवन संपविले. पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासात निष्काळजीपणा दाखवल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. बसवनबागेवाडी पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असता गावकऱ्यांचा पोलिसांशी वाद झाला.
एसपींनी घटनास्थळी येऊन गंगाधर यांच्या मृत्यूला न्याय द्यावा अशी मागणी संतप्त गावकऱ्यांनी यावेळी केली.


Recent Comments