Hukkeri

दलित नेत्यांच्या नागपूर यात्रेसाठी रमेश कत्तींच्या शुभेच्छा

Share

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १४ ऑक्टोबरला बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. हि गोष्ट इतिहासात मैलाचा दगड ठरली असून नागपूर येथील दीक्षाभूमीच्या दिशेने बेळगावमधील दलित नेते रवाना झाले आहेत. या दलित नेत्यांना डीसीसी बँकेचे अध्यक्ष रमेश कत्ती यांनी शुभेच्छा दिल्या.

मंगळवारी आंबेडकर जनजागृती वेदिकेचे कार्यकर्ते नागपूर येथे बसमधून रवाना झाले. यावेळी त्यांच्या बसला चालना दिल्यानंतर रमेश कत्ती बोलत होते. अत्यन्त पवित्र अशा बौद्ध धर्माची दीक्षा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घेतली हि ऐतिहासिक बाब आहे. धार्मिक अल्पसंख्यांक आणि मागासवर्गीय जनतेसाठी हा आशेचा किरण असल्याचे ते म्हणाले. हिंदू धर्मातील विषमता, अस्पृश्यता, जातीयवाद आणि नागरिकांना देण्यात येणारी दुजाभावाची वागणूक या सर्व गोष्टींमुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारला. हा दिवस भारतीय सणाप्रमाणे साजरा करतात हि अभिमानाची बाब असल्याचे कत्ती म्हणाले.

यावेळी अध्यक्ष ए के पाटील, उपाध्यक्ष आनंद गंध, सदस्य महांतेश तळवार, राजू मुन्नोळी, सदाशिव कऱेप्पगोळा , नेते अशोक पट्टणशेट्टी, परगौडा पाटील, तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी उमेश सिदनाळ, सीपीआय महम्मद रफिक तहसीलदार, रमेश छायागोळ, राजशेखर पाटील, नेते दिलीप होसमनी, मल्लिकार्जुन राशिंगे, केम्पना शिरहट्टी, लक्ष्मण हुली, के वेंकटेश, श्रीनिवास व्यापारी, सोमू जीवण्णावर, गंगाराम हुक्केरी, मल्लू कुरणी, शिवू दोड्डमनी, भाऊसाहेब पांढरे, सुखदेव तळवार आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Tags: