दरवर्षीप्रमाणे दसऱ्याच्या निमित्ताने हुक्केरी तालुक्यातील हुनर आर सी या गावात श्री विठ्ठलदेव यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. वाद्यवृंदाच्या उपस्थितीत पालखी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी विविध धार्मिक विधींचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाविकांनी भंडारा उधळून यात्रोत्सवात सहभाग घेतला. बेळगाव जिल्ह्यात विठ्ठलदेव यात्रा भंडारा यात्रा म्हणून परिचित आहे.

यासंदर्भात प्रसारमाध्यमांना माहिती देताना गोकाक शहरातील उद्योजक पुंडलिक मेटी म्हणाले, दरवर्षीप्रमाणे विठ्ठलदेव यात्रा आयोजित करण्यात येते . यात्रेसाठी बेळगाव जिल्ह्यातील विविध भागातून भाविक हजेरी लावतात. यंदा देवाकडे उत्तम पीकपाणी होउदे समृद्धी आणि शांती नांदू देत यासाठी साकडे घालण्यात आले. हुनुर गावात विठ्ठलदेव मंदिराची नूतन वास्तू उभारण्यात येत असून यासाठी भाविकांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
यानंतर शस्त्रपूजा करण्यात करण्यात आली. माजी जिल्हा पंचायत सदस्य भीमाप्पा रामगोनट्टी म्हणाले, शासनाने हिडकल जलाशयाच्या मागील बाजूस असली देवस्थान स्थलांतरित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या कार्यात देवाच्या कृपेने कोणतीही अडचण येणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी कशाप्पा बडाई, हालप्पा रक्षी, कृष्णप्पा गडकरी, शिद्दप्पा कानोजी, श्रीकांत मगदूम, विठ्ठल बंटी, अडिवेप्पा कमते, पुंडलिक मेटी आणि बंधू, पुजारी बंधू, यात्रा कमिटी सदस्य उपस्थित होते. यावेळी महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते.


Recent Comments