Belagavi

बसवण कुडचीत एका माणसाने बैलगाडी ओढण्याची शर्यत

Share

बेळगाव तालुक्यातील शिवशक्ती युवक मंडळ बसवण कुडची यांच्यावतीने एका माणसाने बैलगाडी ओढण्याच्या शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते.

बेळगाव तालुक्यातील बसवण कुडची येथे रविवार दिनांक 2 ऑक्टोबर रोजी सायंकाळी शिवशक्ती युवक मंडळ आयोजित माणसाने बैलगाडी ओढण्याची शर्यत गावातील बसवण्णा मंदिरासमोर पार पडली. शर्यतीच्या उद्घाटन कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माळमारुती पोलीस स्टेशनचे सीपीआय सुनील पाटील उपस्थित होते. सीपीआय सुनील पाटील, डॉ. सतीश चौलीगेर, नगरसेवक बसवराज मोदगेकर, सामाजिक कार्यकर्ते राजू कलेकणावर, नागेश दिवटे, श्रीधर बुडवी, स्वामीजी नीलकंठया हिरेमठ ग्रामपंचायत सदस्य रवी कोटबागी ,सचिन उर्फ डीजे ,गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर धनंजय मुचंडीकर, गजानन कोळुचे, राजू बोगार, मल्लाप्पा कोळुचे, सचिन ताऱ्याळकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन तसेच हिंदूंचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज तसेच श्री गणेश पूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर माळमारुती पोलीस स्टेशनचे सीपीआय सुनील पाटील यांनी बैलगाडी ओढून शर्यतीचे उद्घाटन केले.

खास दसऱ्यानिमित्त ही स्पर्धा पार पडली. यावेळी पहिल्या क्रमांकाचे बक्षीस डॉ. सतीश चौलीगेर यांच्याकडून देण्यात आले. या स्पर्धेत एकूण 13 बक्षिसे ठेवण्यात आली होती. शर्यत अत्यंत उत्साहात आणि आनंदात पार पडली. गावातील अनेक हौशी नागरिकांनी या बैलगाडी ओढण्याच्या शर्यतीमध्ये भाग घेतला होता.

Tags:

cpi sunil patil inaugurated bullock cart competition