राज्यातील लोकांना दसऱ्याच्या शुभेच्छा, आई चामुंडेश्वरी देवीने सर्वांना आशीर्वाद द्यावा, अशी इच्छा मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी व्यक्त केली.
बंगळुरूच्या आरटी नगर येथील त्यांच्या खासगी निवासस्थानी आज मंगळवारी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री बोम्मई यांनी कर्नाटकातील जनतेला दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या.
चामुंडेश्वरी माता सर्वांचे कल्याण करो. दुर्जनांना शिक्षा देवो, सत्पुरुषांचे रक्षण व्हावे. देशात शांती आणि समृद्धी नांदो यासाठी मी चामुंडेश्वरी मातेची प्रार्थना करतो. आज, उद्या दसरा सण आहे. हा सण शांततेत साजरा व्हावा, अशी देशातील जनतेची अपेक्षा आहे असे मुख्यमंत्री बोम्मई यांनी सांगितले.
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या राज्य दौऱ्यासह सर्व राजकीय प्रश्नांबाबत येत्या 6 ऑक्टोबरला उत्तर देईन असे बोम्मई यांनी पत्रकारांच्या या संदर्भातील प्रश्नावर सांगितले.


Recent Comments