धावत्या दुचाकीचा टायर पंक्चर झाल्याने महिला व बालिकेचा मृत्यू झाल्याची दुर्घटना निपाणी तालुक्यातील पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील कुर्ली गावाजवळ घडली. या अपघातात दुचाकी चालक आणि एक बालक गंभीर जखमी झाले आहेत.

चालत्या दुचाकीचा टायर पंक्चर झाल्याने महिला व बालिकेचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्घटना आज सकाळी पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कुर्ली गावाजवळ घडली. अपघातात दुचाकीस्वार व एक बालक गंभीर जखमी झाले. जखमींना निपाणीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सौंदत्ती तालुक्यातील मुगळीहाळ गावातील लक्ष्मी आनंद कोप्पद, वय २५ असे मृत महिलेचे तर भाग्यश्री सागर वकमी, वय १३ रा. कटकोळ, ता. रामदुर्ग असे बालिकेचे नाव आहे. अपघातात हणमंता सक्री, वय 23, मारुती रमेश चुनामादर, वय 6 हे गंभीर जखमी झाले.
निपाणी ग्रामीण स्टेशनच्या पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. निपाणी ग्रामीण पोलीस ठाण्यांत या प्रकरणाची नोंद झाली आहे.


Recent Comments