बेळगाव शहर पोलीस आयुक्तालय आणि जिल्हा पोलीस विभागातर्फे बेळगावात आज नवरात्रानिमित्त भक्तिभावाने आयुध पूजन करण्यात आले.
देशात दसरा सण सर्वात मोठा सण म्हणून साजरा केला जातो. नवरात्रीच्या 9व्या दिवशी प्रत्येकजण आपापल्या घरी आयुध पूजा करतो. त्याचप्रमाणे बेळगावात आज मंगळवारी पोलीस विभागातर्फे आयुध पूजन करण्यात आले. यावेळी एसपी डॉ. संजीव पाटील, अपर एसपी महानिंग नंदगावी यांनी दुर्गादेवीच्या प्रतिमेचे पूजन करून पोलीस शास्त्रागारात पोलिसांची शस्त्रास्त्रे व वाहनांचे पूजन केले. त्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ. संजीव पाटील यांनी आमच्या इन न्यूज-आपली मराठीशी बोलताना, जिल्ह्यातील जनतेला नवरात्र आणि विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या.
बेळगाव शहर पोलीस आयुक्तालयातर्फेही आयुध पूजेचे आयोजन करण्यात आले. यावेळी शहर पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या, डीसीपी रवींद्र गडादी, डीसीपी पी. व्ही. स्नेहा यांनी दुर्गा देवीच्या प्रतिमेचे पूजन करून शस्त्रास्त्रे व वाहनांचे पूजन केले. यानंतर बोलताना पोलीस आयुक्त डॉ. बोरलिंगय्या यांनी शहरातील जनतेला व पोलीस कर्मचाऱ्यांना नवरात्र आणि दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या. देवी दुर्गामाता सर्वांना सुख, शांती आणि समृद्धी देवो आणि सर्वांचे चांगले करो, असे ते म्हणाले.
यावेळी, पौराहित्य करणाऱ्या संगमेश शास्त्रींनी सांगितले की, महानवमीला श्री चामुंडेश्वरी आणि दुर्गा परमेश्वरी देवतांची पूजा केली जाते. दीर्घायुष्य, आरोग्य, ऐश्वर्य, नोकरी, संपत्ती, वाहन यांसाठी वर्षभर आयुध पूजन करण्याची परंपरा आहे. ते म्हणाले, बेळगावातील तमाम नागरिकांना सुख, शांती, समृद्धी, दीर्घायुष्य आणि आरोग्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. बाइट
एकंदर पोलीस खात्यात वापरल्या जाणाऱ्या बंदुका, चिलखते, रायफल्स, गोळ्या, वाहने आणि इतर शस्त्रांची पोलिसांनी आज आयुधपूजेनिमित्त मनोभावे पूजा केल्याचे दिसून आले.


Recent Comments