Belagavi

बेशुद्ध झालेल्या व्यक्तीला ऍलन मोरे यांची मदत

Share

बेशुद्ध झालेल्या व्यक्तीला ऍलन मोरे यांची मदत

बेशुद्ध अवस्थेत असलेल्या व्यक्तीला रुग्णालयात दाखल करून बेळगावच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी माणुसकी दाखवली.
पिरनवाडी औद्योगिक वसाहतीजवळ विजापूर येथील एक व्यक्ती बेशुद्धावस्थेत पडून होता. त्यावेळी तेथून जाणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते ऍलन मोरे आणि सॅम्युअल रॉड्रिग्स यांच्या ते लक्षात येताच त्यांना तातडीने त्या व्यक्तीला स्थानिक रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली असता रक्तदाब कमी झाल्याने तो बेशुद्ध पडल्याचे समजून आले.

त्याच्यावर योग्य उपचारानंतर ऍलन मोरे आणि सॅम्युअल रॉड्रिग्स यांनी त्या व्यक्तीच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून त्याला विजापूर येथे घरी पाठवले. त्यांच्या या कार्याचे लोकांनी कौतुक केले

Tags:

alan more helped to injured person