सोनिया गांधी आणि प्रियांका वाड्रा या राज्यात आल्या तर त्यांचे स्वागतच करेन असे विधान माजी उपमुख्यमंत्री आणि विधान परिषद सदस्य लक्ष्मण सवदी यांनी केले.

: सोनिया गांधींनी ज्या ज्या ठिकाणी पाऊल ठेवले त्या त्या ठिकाणी कमळच फ़ुलले त्यामुळे त्यांचे स्वागत मी नक्की कारेन असा टोला सवदी यांनी लगावला. काँग्रेसने देशातील नेतृत्व गमावले आहे. त्यामुळे ‘भारत जोडो’ सोडून आता ‘सिद्धरामय्या आणि डिके जोडो’ यासाठी राहुल गांधींनी भारत जोडो अभियान राबवावे अशा शब्दात त्यांनी खिल्ली उडविली.
भारत जोडण्यासाठी भारत विखुरला गेला नाही. यासाठी आपण वल्लभभाई पटेल यांचे आभार मानले पाहिजे, त्यांनी अनेक राज्ये आणि प्रांत एकत्रित केले. मात्र काँग्रेस भारत जोडो कशासाठी करत आहे? असा मिश्किल सवाल देखील त्यांनी उपस्थित केला


Recent Comments