समाजाला संघटित करून देव, देश अन धर्माच्या रक्षणाच्या हेतूने शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने भव्य दुर्गामाता दौड काढण्यात येते. आज आठव्या दिवशी या दौडीने जातीय सलोख्याचा संदेश प्रत्यक्ष कृतीतून देण्यात आला. कॅम्प परिसरात निघालेल्या दौडीचे मुस्लिम बांधवांकडून भव्य स्वागत करण्यात आले.
बेळगाव शहरात नवरात्र उत्सवानिमित्त आज आठ्या दिवशीही भव्य दौड काढण्यात आली. कॅम्प परिसरात झालेल्या दौडचे मुस्लिम नेत्यांनी फळांच्या टोपल्या वाटून स्वागत केले हे विशेष.
होय, बेळगाव शहरात गेल्या २० वर्षांपासून शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे दसऱ्याच्या निमित्ताने दुर्गामाता दौड काढण्यात येते. शहरातील कॅम्प परिसरातील मद्रास स्ट्रीट येथे यंदाच्या आठव्या दिवशीच्या दुर्गामाता दौडीचे भव्य स्वागत करण्यात आले. पारंपारिक वेशभूषा केलेले तरुण-तरुणी दौडमध्ये सहभागी झाले होते. यावेळी कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील रस्त्यांवर सुबक रांगोळ्या काढून मार्गावर फुलांची उधळण करण्यात आली. ध्वजवाहक पुढे जात असताना, तरुण-तरुणी दौडमध्ये मागे कूच करत होते. यावेळी रहिवाशांनी ध्वजाला हार घालून दौडचे स्वागत केले. फ्लो
यावेळी जिजामातेची वेशभूषा केलेल्या एका लहान मुलीने शिवाजी महाराजांचे गुणगान गायले. यावेळी या महाराजाच्या चिमुरडीच्या धाडसी गुणगानाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
यावेळी दौडचे स्वागत करणाऱ्या निर्जरा यांनी आमच्या इन न्यूज-आपली मराठीशी बोलताना सांगितले की, दरवर्षी प्रमाणे दुर्गा माता दौड उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. मार्गावर रांगोळी सजवली आहे. यावेळी दौडीचे स्वागत करताना मला खूप आनंद होत आहे. हिंदू धर्माचा प्रसार करण्याच्या उद्देशाने ही दौड काढली जात असून हा उपक्रम असाच सुरू राहावा.
कॅम्प परिसरात दुर्गामाता दौड प्रवेश करताना मुस्लिम समाजाच्या नेत्यांनी दौडचे पुष्पहार घालून स्वागत केले हे विशेष. यावेळी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष साजीद शेख यांच्या हस्ते सर्वांना पाणी व फळांच्या टोपल्यांचे वाटप करण्यात आले.
आमच्या इन न्यूज-आपली मराठीशी बोलताना साजीद शेख म्हणाले की, नवरात्र-दसरा उत्सवानिमित्त काढण्यात येणाऱ्या दुर्गामाता दौडचे आमच्या कॅम्प परिसरात स्वागत करण्यात येते. या वेळीही दौडचे स्वागत करण्यात आले. यावेळी दौडमध्ये सहभागी झालेल्या सर्वांचे स्वागत पाणी, साखर व फळांच्या टोपल्या देऊन करण्यात आले. ही संधी दिल्याबद्दल मी दौडच्या सर्व आयोजकांचा, सदस्यांचा आभारी आहे. सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा.
यानंतर दौड श्री शिवतीर्थ, काँग्रेस रोड, ग्लोब टॉकीज रोड, इंडिपेंडंन्स रोड, हाय स्ट्रीट, चर्च स्ट्रीट, कल्याणी स्वीट मार्ट रोड, गवळी गल्ली, कोर्ट स्ट्रीट, वेस्ट स्ट्रीट, कोंडाप्पा रोड, मद्रास रोड, कुंती माता मंदिर, फिश मार्केट, तेलुगु कॉलनी, केटी पुजारी दुर्गामाता मंदिर, खानापूर रोड, धर्मवीर संभाजी महाराज चौक मार्गे दुर्गामाता मंदिर, जत्तीमठ येथे जाऊन दौडची सांगता झाली.


Recent Comments