Belagavi

निवृत्त पोलीस, अधिकाऱ्यांसाठी आरोग्य शिबीर

Share

बेळगाव शहरातील विविध रुग्णालये स्वयंसेवी संस्थांतर्फे सेवानिवृत्त पोलीस अधिकारी, कर्मचारी कुटुंबीयांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन आज करण्यात आले होते.

होय, बेळगाव जिल्हा पोलिस, लेकव्ह्यू हॉस्पिटल, केएलई हॉस्पिटल आणि डॉ. गिरीश सोनवलकर फाउंडेशनच्या वतीने सेवानिवृत्त पोलीस अधिकारी, कर्मचारी व कुटुंबीयांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात एसपी डॉ.संजीव पाटील, अतिरिक्त एसपी महानिंग नंदगावी, डॉ. गिरीश सोनवलकर, निवृत्त एसपी नेतलकर आदींची उपस्थिती होती. यावेळी फीत कापून आरोग्य तपासणी शिबिराचे उदघाटन करण्यात आले.

यावेळी बोलताना निवृत्त एसपी नेतलकर म्हणाले की, बेळगावात अशा प्रकारची आरोग्य तपासणी प्रथमच होत आहे. त्यामुळे या कामासाठी पुढे आलेल्या सर्व रुग्णालये आणि स्वयंसेवी संस्थांचे मी विशेष आभार मानू इच्छितो. बाइट

यावेळी बोलताना डॉ. गिरीश सोनवाळकर यांनी, आज गांधी जयंती व ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. असे आरोग्य शिबिर आयोजित केल्याबद्दल मी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानू इच्छितो असे सांगितले. बाइट

यावेळी बोलताना एसपी डॉ. संजीव पाटील म्हणाले, पोलीस कर्मचाऱ्यांनी कर्तव्य बजावताना त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केलेले असते. त्यामुळे निवृत्तीनंतर त्यांच्या प्रकृतीत चढ-उतार होतात. या संदर्भात आमचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आमच्या वरिष्ठ अधिकारी व कर्मचार्‍यांनी अतिशय नेटकेपणे या कार्यक्रमाचे नियोजन केले आहे. येत्या काळात आम्हाला व सेवानिवृत्त अधिकारी व त्यांच्या कुटुंबियांना चांगली सेवा दिली जाईल. येथे आलेल्या सर्व अधिकाऱ्यांचे आभार. बाइट

विविध रुग्णालयांकडून आयोजीत या शिबिरात असंख्य निवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आरोग्य शिबिराचा लाभ घेतला. यावेळी विविध रुग्णालयांचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी, पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी आदी उपस्थित होते.

Tags: