चालता येत नसल्याने असहाय्य अवस्थेत येळ्ळूर रोडवर बसलेल्या व्यक्तीला सामाजिक कार्यकर्ते संतोष दरेकर व शेतकरी नेते राजू मरवे यांनी जिल्हा रुग्णालयात दाखल करून माणुसकीचे दर्शन घडविले.

बेळगावजवळील येळ्ळूर रोड भागात चालता येत नसलेला एक असहाय्य व्यक्ती रस्त्याकडेला बसला होता. त्याच्या पायावर गळू आढळून आला. चालता न येता हा माणूस रस्त्याच्या कडेला रेंगाळत होता. हा प्रकार लक्षात येताच समाजसेवक संतोष दरेकर व शेतकरी नेते राजू मरवे यांनी थांबून त्याची विचारपूस केली. यावेळी त्या व्यक्तीने तो मुंदगोडा, हुबळी येथील असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी पीडित व्यक्तीची माहिती घेण्यासाठी भाऊ प्रसन्न यांना फोन केला असता त्यांनी फोन घेतला नाही. त्यामुळे त्याचा मित्र रवी हेगडे यांना फोन करून माहिती देण्यात आली. यावेळी पायाला गळू लागल्याने त्या व्यक्तीला चालता येत नव्हते. त्यामुळे संतोष दरेकर आणि राजू मरवे यांनी सदर व्यक्तीवर उपचार सुरू असलेल्या रुग्णालयात फोन केला असता त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्याची माहिती दिली. त्यानंतर राजू मरवे व संतोष दरेकर यांनी सदर व्यक्तीच्या प्रकृतीची माहिती घेतली. यावेळी त्या व्यक्तीची प्रकृती खालावल्याने त्यांनी जिल्हा रुग्णालयात फोन करून रुग्णवाहिका मागवून त्या व्यक्तीला रुग्णवाहिकेने रुग्णालयात दाखल केल्याची माहिती दिली.
या व्यक्तीला माणुसकीच्या दृष्टीने जिल्हा रुग्णालयात दाखल करून उपचार देण्यात आले आहेत. संतोष दरेकर आणि राजू मरवे यांच्या मानवतावादी कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.


Recent Comments