Belagavi

प्रेषित महम्मद पैगंबर यांना जाणून घेण्याची गरज : डॉ. अल्लमप्रभू महास्वामी

Share

बेळगावमधील शांती संदेश ट्रस्ट कार्यालयात सिरत अभियानांतर्गत प्रेषित महम्मद यांच्यावर आधारित कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून डॉ. अल्लमप्रभू महास्वामी यांची उपस्थिती होती.

यावेळी बोलताना अल्लमप्रभू महास्वामी म्हणाले, गेल्या ३० ते ५० वर्षांपूर्वी सर्वांचे सौहार्दाचे, विश्वासाचे संबंध होते. मात्र आधुनिकीकरणात हे संबंध कमी होत चालले असून याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. सर्व धर्म जगात शांतीचा संदेश देतात. याचप्रमाणे प्रेषित महम्मद पैगंबर यांनीही जगाला शांतीचा संदेश दिला. महम्मद पैगंबरांची तत्वे साऱ्यांनी जाणून घेणे आवश्यक आहे, यासाठी असे कार्यक्रम आयोजित केले गेले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

यावेळी माजी महापौर मालोजीराव अष्टेकर, सेवानिवृत्त प्राचार्य जनाब मेहबूब अली बळगानूर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनाब शाहीन मेमन होते. यावेळी जमात- ए- इस्लामी हिंद बेळगावचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

Tags:

seerat abhiyan