चिकोडी तालुक्यातील काडापूर ते अंकली गावातील शिवालयापर्यंतच्या रस्त्याच्या रुंदीकरणास शासनाने मंजुरी दिली आहे. काडापूर गावातील विविध विकास कामासाठी ४.५० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी यांनी दिली.

काडापूर गावातील रस्ते विकासकामांचा शुभारंभ केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. काडापूर गावापासून अंकलीपर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरण व्हावे अशी मागणी अनेक दिवसांपासून करण्यात येत होती. या मागणीचा प्रस्ताव सरकारकडे पाठविण्यात आल्यानंतर या कामकाजासाठी २ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता.

काडापूर ते केरूर क्रॉसपर्यंतच्या रस्तेकामासाठी १ कोटी, गावातील हरिजन केरी ते नंदीकुरळी रस्त्याच्या विकासासाठी १ कोटी रुपये तसेच गावातील पूल बांधकामासाठी असा एकूण ४.५० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याचे प्रकाश हुक्केरी यांनी सांगिले. आमदार गणेश हुक्केरी यांच्या प्रयत्नातून सरकारकडून अनुदानाला मंजुरी मिळविण्यात आली असून दर्जेदार काम करण्याच्या सूचनाही प्रकाश हुक्केरी यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी तालुका पंचायतीचे माजी सदस्य प्रकाश राचन्नावर, ग्राम पंचायत अध्यक्ष सुभाष सनदी, संभाजी पवार, मछिंद्र काडापुरे, भरत कोळेकर, नंदकुमार दरबारे, शिवाजी शिंदे, नंदकुमार शिंदे, विजय बडिगेर, प्रमोद बडिगेर आदी उपस्थित होते.


Recent Comments