बेळगावात आज आमदार अभय पाटील यांच्या हस्ते पथारी व्यावसायिकांना पंतप्रधानांच्या अभिनंदन पत्राचे वाटप करण्यात आले.

प्रधानमंत्री स्वनिधी योजनेंतर्गत, रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या लाभार्थ्यांना सरकार 10,000 रुपये, 20,000 रुपये आणि 50,000 रुपयांच्या लघुकर्जाची सुविधा देत आहे. या योजनेच्या लाभार्थ्यांना बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांच्या हस्ते अभिनंदन पत्रांचे वाटप करण्यात आले.
रस्त्यावरील व्यापार्यांना पंतप्रधानांचे समर्थन असे शब्द असलेले स्वनिधी योजनेच्या लाभार्थींचे अभिनंदन पत्र व लाभार्थ्यांना नाव फलक आमदार अभय पाटील यांच्या हस्ते महापालिका सभागृहात वाटप करण्यात आले.
यावेळी मनपा आयुक्त डॉ. रुद्रेश घाळी, प्रशासकीय उपायुक्त भाग्यश्री हुग्गी, महसूल अधिकारी प्रशांत हनगंडी यांच्यासह महामंडळाचे कर्मचारी उपस्थित होते.


Recent Comments