बेळगाव-खानापूर रस्त्यावर असणाऱ्या मच्छे भागातील चौगुले नगर येथील गटारी मधील सांड पाणी रस्त्यावर वाहत असून, त्यामुळे या भागात समस्या निर्माण झाली आहे, या संबंधित मच्छे नगर पंचायत अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते पण नगर पंचायतीनं याकडे साफ दुर्लक्ष केले आहे.
आज चौगुले नगर परिसरात दुर्गामाता दौड असल्याने स्थानिक युवकांनी सदर गटारीवर खडी आणि माती पसरवून रस्ता तयार केला होता पण काल अचानक पाऊस पडल्याने माती वाहून गेली आणि चिखल झाला आणि त्या मधून च युवक दुर्गामाता दौड काढावी लागली.
पिरणवाडी ते मच्छे रस्ता रुंदीकरण करताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला गटारी करणे आवश्यक होते पण सार्वजनिक बांधकाम विभागाने फक्त रस्ता रुंदीकरण करून गटारी च निर्माण केल्या नाही त्यामुळे पिरणवाडी ते मच्छे या मुख्य रस्त्यावर असणाऱ्या लोक वस्तींना यामुळे विविध समस्यांना सामोरे जावे लागते. तरी या बाबतीत अधिकाऱ्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून चौगुले नगर मधील गटारीचे समस्या दूर करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे


Recent Comments