Belagavi

स्टेट रोलर स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये चमकले बेळगावचे स्केटर्स

Share

शिमोगा येथे नुकत्याच झालेल्या स्टेट रोलर स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये बेळगावचे स्केटर्स चमकले आहेत.

शिमोगा महानगर पालिका आणि कर्नाटक रोलर स्केटिंग असोसिएशनतर्फे 27 ऑक्टोबर 2022 रोजी बाल दसरा ओपन स्टेट रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप 2022 चे आयोजन करण्यात आले होते. या चॅम्पियनशिपमध्ये जवळपास राज्यभरातील 400 स्केटर्स सहभागी झाले होते. त्यात बेळगावच्या आराध्या पी. आणि आर्या कदम यांनी चमकदार कामगिरी केली.

स्पीड स्केटिंगमध्ये आराध्या पी. हिने 1000 मीटर रिंक रेसमध्ये 1 सुवर्ण पदक मिळवले. तर आर्या कदम हिने 1000 MTR रिंक रेस मध्ये रौप्य पदक, 500 MTR रिंक रेसमध्ये 1 कांस्य पदक पटकावले. आर्या आणि आराध्या या गेल्या ४ वर्षांपासून केएलई सोसायटीच्या स्केटिंग रिंक, रोटरी कॉर्पोरेशन स्पोर्ट्स अकादमी स्केटिंग रिंक, गुड शेफर्ड सेंट्रल स्कूल इंटरनॅशनल स्केटिंग ट्रॅकवर स्केटिंगचा सराव करत आहेत. त्यांना डॉ. प्रभाकर कोरे, कुडचीचे माजी आमदार शाम घाटगे, राज घाटगे, कर्नाटक रोलर स्केटिंग असोसिएशनचे सरचिटणीस इंदुधर सीताराम, बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनचे अध्यक्ष उमेश कलघटगी, प्रसाद तेंडुलकर यांचे प्रोत्साहन लाभले. त्या स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, योगेश कुलकर्णी, मंजुनाथ मंडोळकर, विठ्ठल गगणे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहेत

Tags:

belgaum sketing championship