बेळगावात रंगसपदा, बेळगावच्या वतीने 7 ऑक्टोबरपासून तीन दिवस शारदीय कन्नड नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती डॉ. अरविंद कुलकर्णी यांनी दिली.
बेळगावात आज शनिवारी पत्रकार परिषदेत बोलताना डॉ. अरविंद कुलकर्णी म्हणाले, यंदाच्या शारदीय मोसमात आपल्या सांस्कृतिक उपक्रमांची सुरुवात करण्यासाठी शहरातील लोकमान्य रंगमंदिर येथे तीन दिवसीय शारदीय नाट्य महोत्सवाचे आयोजन केले आहे. शुक्रवारी पहिले नाटक श्री कृष्णमूर्ती कवत्तारा दिग्दर्शित 70 मिनिटांचा “तायीयागूवदु एंदरे- आई होणे म्हणजे…” हा एकपात्री व्यक्तिरेखेचा कार्यक्रम सायंकाळी 6.30 वाजता होणार आहे. 8 रोजी सर्वथेटरम्, 9 रोजी ‘वंशवृक्ष’ नाटक सादर होणार आहे. या महोत्सवाला नाट्यप्रेमींनी मोठ्या संख्येने यावे, असे आवाहन करण्यात आले.
गुरुनाथ कुलकर्णी, प्रशांत कारजोळ, अशोक कुलकर्णी आदी या पत्रकार परिषदेला उपस्थित होते.


Recent Comments