Athani

कुपोषणमुक्त भारत बनविण्यासाठी सरकार प्रयत्नशील : अशोक कांबळे

Share

अथणी येथे पोषण अभियानांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचे उद्घाटन अथणी सीडीपीओ अशोक कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले.

राज्यातील कुपोषित बालके तसेच महिला व मुलांना निरोगी बनविण्यासाठी महिला व बालकल्याण विकास विभागाच्या वतीने सप्टेंबर महिना अखेरीस पोषण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन सीडीपीओ अशोक कांबळे यांच्याहस्ते करण्यात आले.

पोषण अभियानांतरागत संपूर्ण महिन्याचे निश्चित वेळापत्रक देण्यात आले असून सप्टेंबर महिन्यातील यादीनुसार दररोज महिलांना विविध प्रकारचा आहार देण्यात येणार आहे. प्रत्येक गावपातळीवर आणि शहर पातळीवर या कार्यक्रमाचे आयॊजन करण्यात येत असून सदर प्रकल्पासंदर्भात जगजागृतीही करण्यात येत आहे. कुपोषणमुक्त भारत बनविण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून सर्वांनी यासाठी हातभार लावून मोहीम यशस्वी करावी असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी तहसीलदार सुरेश मुंजे बोलताना म्हणाले, प्रत्येक माता व बालकाच्या उत्तम आरोग्यासाठी जीवनसत्त्वयुक्त आणि लोहयुक्त असा आहार घ्यावा तसेच समतोल आहार घ्यावा. गर्भवती महिलांनी अधिक काळजी घेऊन आरोग्य राखावे, असा सल्ला त्यांनी दिला.

तालुका वैद्यकीय अधिकारी बसवराज कागे यांनी बोलताना सांगितले, जन्मानंतर बालकांचे आरोग्य राखणे हे प्रत्येक महिलेचे कर्तव्य आहे. गर्भवती महिलांनी पौष्टिक अन्न खावे जेणेकरून बाळाच्या विकासात मदत होते. सुदृढ बाळासाठी फळे खावीत, गर्भवतींनी टप्प्याटप्प्याने आरोग्य तपासणी करावी, काही समस्या असल्यास त्यांनी लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे त्यांनी सांगितले.

यावेळी तहसीलदार सुरेश मुंजे, वैद्यकीय अधिकारी बसवराज कागे, समाज कल्याण अधिकारी प्रवीण पाटील, तालुका पंचायत व्यवस्थापक उदयगौडा पाटील, क्षेत्र तालुका आरोग्य समन्वयक ए.बी.गुळळेदार, पोषण अभियान तालुका समन्वयक माला कांबळे, सुजाता पाटील, बी बी वाली, कमला सवसुद्दी, ए.बी. चव्हाण, शोभा मगदूम, रूपा कोडते, कलादगी, डॉ.रमिता, शशिकला हेडगे, रूडगी, भोसले, ए.बी.कांबळे यांच्यासह अंगणवाडी पर्यवेक्षिका, सेविका, मदतनीस उपस्थित होते.

 

Tags:

poshan abhiyan athani