Belagavi

डेंग्यूमुळे कारदगा येथील युवकाचा मृत्यू

Share

डेंग्यूने आजारी असलेल्या 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना निपाणी तालुक्यातील कारदगा गावात घडली.

प्रेम संजय कमते, वय 19 असे मृत तरुणाचे नाव आहे. मृत प्रेम कमते हा बीएस्सीच्या पहिल्या सत्रात शिकत होती. त्याच्यात डेंग्यू तापाची लक्षणे आढळल्याने गेल्या 8 दिवसांपासून एका स्थानिक खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र त्याची प्रकृती अचानक अधिक बिघडल्याने त्याला महाराष्ट्रातील इचलकरंजी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार निष्फळ ठरल्याने तेथे त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर कारदगा गावात डेंग्यूबाबत भीतीचे वातावरण पसरले आहे.

डेंग्यू विरोधात ग्रामपंचायत व आरोग्य विभाग खबरदारीच्या उपाययोजना करत आहेत.

Tags:

dengue youth death