Belagavi

अभय पाटील यांच्या हस्ते विविध कामांचा शुभारंभ

Share

आमदार अभय पाटील यांच्या हस्ते बेळगाव दक्षिण मतदारसंघातील विविध भागातील सीसी रोड, ड्रेनेज, पेव्हर्स रोड बांधकामासह विविध विकास कामांचे आज उद्घाटन करण्यात आले.

आमदार अभय पाटील यांनी बेळगाव तालुक्यातील हुंचेनट्टी, कावेरीनगर, पार्वतीनगर येथे काँक्रीट रस्ता आणि गटार आणि पेव्हर्स रोड बांधकाम तसेच जलजीवन मिशन अंतर्गत पाईपलाईन बसविण्याच्या कामाचे भूमिपूजन करून चालना दिली. त्याचवेळी आमदार अभय पाटील यांच्या हस्ते विश्वनाथ कॉलनी, पार्वती नगर, बीटी नगर, कावेरी कॉलनी या भागातील रस्ता बांधकामाचे तसेच इतर भागातील आरसीसी ड्रेनेज बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी पार्वतीनगरात विविध कामांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी दक्षिण मतदारसंघातील लोकही कार्यक्रमात सहभागी झाले होते.

यावेळी बोलताना आमदार अभय पाटील म्हणाले की, या भागातील नागरिकांनी रस्ता व गटारीचे काम करावे, अशी मागणी केली होती. एक कोटी रुपये खर्चून हे काम होईल, असे मला वाटले. मात्र एस्टीमेट केल्यावर ते 3 कोटी 70 लाख रुपये खर्चाचे झाले. यावेळी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन अर्थसाह्य देण्याची विनंती करण्यात आली. त्यानुसार मुख्यमंत्र्यानी अनुदान मंजूर केल्याने मुख्यमंत्र्यांचे मी आभार मानतो. पहिल्या टप्प्यात ही कामे करण्यात येत असून येत्या काही दिवसांत सर्वच भागात व्यवस्था करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी हुंचेनट्टी, स्वामीनाथ कॉलनी, पार्वती नगर, बीटी नगर, कावेरी कॉलनी आदी भागातील नागरिक उपस्थित होते.

Tags:

belgaum mla abhay patil development work