बेळगाव शहरात दसरा महोत्सवाच्या निमित्ताने ९५व्या नाडहब्बा उत्सव समितीच्या वतीने विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
नवरात्रोत्सवाच्या चौथे दिवशी विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. मठातील मान्यवरांचे शैक्षणिक आणि सामाजिक योगदान या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन गुरुवारी करण्यात आले होते. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून प्रा. के.एस.कौजलगी, बाळाप्पा रायण्णावर, सी एम नरसन्नावर, आर बी कडप्पनवार आणि कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रवचनकार मृत्युंजयस्वामी हिरेमठ हे उपस्थित होते . तर गदग येथील तोंटदार्या मठाचे डॉ. सिद्धाराम महास्वामी यांनी आशीर्वचन दिले.
यावेळी कार्यक्रमाला उद्देशून बोलताना व्याख्याते, साहित्यिक, प्रो. के एस कौजलगी म्हणाले, यंदा शाळा महाविद्यालयात देखील दसरा महोत्सव साजरा करण्यात येत आहे. हा सण शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढविणारा सण असून देवीच्या उपासनेचा उत्सव आहे. कर्नाटक एकीकरणाचे हा सण साजरा करण्यात मोठे सहकार्य लाभत असल्याचे ते म्हणाले. बेळगावच्या उत्सवालाहि मोठा इतिहास असल्याचे ते म्हणाले.
यावेळी डॉ. तोंटद सिद्धाराम महास्वामींनी हनगल कुमार शिवयोगी यांच्या कार्याचे स्मरण करून दिले. शिरसंगी लिंगराज देसाई यांना सनमार्ग दाखविणारे हनगल कुमार शिवयोगी यांनी समाजसुधारणेसाठी अनेक उपक्रम केल्याचे त्यांनी सांगितले
यावेळी उत्सव समितीचे सदस्य, पदाधिकारींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments