hubali

हुबळीत पोस्टर वॉर जोमात : ‘पे सीएम’ नंतर आता ‘पे मेयर’

Share

देशभरात पे सीएम ने बराच धुमाकूळ घातला. आता याच धर्तीवर हुबळी शहरात ‘पे मेयर’ पोस्टर मोहीम जोरदार सुरु झाली आहे.

‘पे सीएम’ वरून सुरु झालेला वाद चव्हाट्यावर आला.. सोशल मीडियावर या पोस्ट मोठ्या प्रमाणात वायरल झाल्या. मात्र आता ‘पे सीएम’ नंतर हुबळी शहरात ‘पे मेयर’ पोस्टर मोहीम जोरदार सुरु झाली आहे. हुबळी शहरातील प्रमुख मार्गांवरील भिंतींवर ‘पे मेयर’चे पोस्टर्स झळकले आहेत.

राष्ट्रपतींच्या हुबळी दौऱ्यादरम्यान आयोजित करण्यात आलेल्या सत्कार कार्यक्रमाच्या नावाखाली दीड कोटी रुपयांचा खर्च केल्याबद्दल ‘पे मेयर’ हा पोस्टर उपक्रम सुरु करण्यात आला असल्याची चर्चा आहे. काँग्रेस नेत्यांनी हुबळी मनपा महापौरांवर कडक ताशेरे ओढले आहेत.

हुबळीतील प्रमुख मार्गांवरील भिंतीवर तसेच कचरा पेटीवर ‘पे मेयर’ पोस्टर्स लावण्यात आले आहेत. याबाबत हुबलीचे महापौर इरेश अंचटगेरी यांना विचारण्यात आले असता हे कृत्य प्रसिद्धी मिळविण्यासाठी करण्यात आल्याचे ते म्हणाले. याबाबत पोलीस आयुक्तांना कळवण्यात आले असून रजत उळागड्डीमठ, दीपक चिंचोरे, मंजुनाथ नडट्टी या तिघांविरोधात तक्रार देखील करण्यात आल्याचे महापौरांनी सांगितले.

एकीकडॆ राज्याच्या मुख्यमंत्र्यांवरून सुरु झालेली ‘पे सीएम’ पोस्टर मोहीम.. या वरून झालेला वाद आणि आता हुबळी धारवाड महापौरांवर पोस्टर्सच्या माध्यमातून ओढण्यात आलेले ताशेरे… यावरून आता जनताच संभ्रमात सापडली असून पोलीस विभागाने याचा योग्य तपस करून सत्य परिस्थिती सर्वांसमोर आणावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Tags:

pay mayor pay mayor hubli dharwad