जात, धर्म, गरीब – श्रीमंत या असा कोणताही भेद न करता तरुणांना रोजगार पुरविणाऱ्या अरिहंत संस्थेचे कार्य मोलाचे आहे, असे मत आणि शिवरायांच्या भुमिकांसाठी प्रसिद्ध असलेले ज्येष्ठ अभिनेते महाराष्ट्रातील खासदार अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले.


निपाणी तालुक्यातील तवंदी या गावात ब्रह्मनाथ भवनच्या प्रांगणात झालेल्या उत्तम पाटील यांच्या सत्कार सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. अरिहंत संस्थेचे संचालक आणि युवा नेते उत्तम पाटील यांना नुकताच “युथ आयकॉन” पुरस्कार मिळाला आहे. या पार्श्वभूमीवर निपाणी येथे त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला. या सत्कार सोहळ्यास डॉ. अमोल कोल्हे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना डॉ. अमोल कोल्हे यांनी उत्तम पाटील यांचे अभिनंदन करून अरिहंत संस्थेच्या माध्यमातून पुरविल्या जाणाऱ्या रोजगाराच्या संधींबाबत त्यांनी कौतुक केले.
यावेळी सत्काराला उत्तर देताना उत्तम पाटील म्हणाले, रावसाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली बंधू अभिनंदन पाटील आणि संस्थेचे संचालक मंडळ, कर्मचारी वर्ग तसेच नागरिकांच्या सहकार्यामुळे आज मला हा पुरस्कार मिळाला आहे. आज निपाणी येथील नागरिकांनी माझा सत्कार केल्या त्याबद्दल आपण त्यांचे ऋणी आहोत, असे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी माजी आमदार सुभाष जोशी, निपाणी नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर, शुभांगीनी जोशी, नम्रता कामटे, अरिहंत संस्थेचे संचालक अभिनंदन पाटील, निपाणी नगरपालिका सदस्य सुनील पाटील, दिलीप पठाडे, दीपक सावंत तसेच बोरगाव नगरपंचायत अध्यक्ष आणि सदस्य, उत्तम पाटील समर्थक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments