सोशल मीडियावर मुले पळविणाऱ्या टोळींबद्दल व्हिडीओ वायरल झाले असून नागरिकांमध्ये या व्हिडीओमुळे मोठी दहशत पसरली आहे. विशेषतः ग्रामीण भागातील नागरिकांनी याची मोठी धास्ती घेतली असून संशयास्पदरित्या वावरणाऱ्या व्यक्तींवर देखील संशयाच्याच नजरेने पहिले जात आहे. अशातूनच विजापूरमधील तिकोटा परिसरात फिरणाऱ्या एका व्यक्तीला नागरिकांनी पकडून बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे.
राज्यात मुले पळविणाऱ्या टोळीच्या अनेक अफवा पसरल्या आहेत. विजापूरमध्येही मुले पळविणाऱ्या टोळीचा धसका नागरिकांनी घेतला असून सतर्क राहणाऱ्या नागरिकांना आता प्रत्येक व्यक्तीमध्ये मुले पळविणाऱ्या टोळीचा भास होत आहे. विजापूरमधील आंबेडकर क्रीडांगणानजीक संशयास्पदरित्या वावरणाऱ्या एका व्यक्तीला मुले पळविणाऱ्या टोळीतील समजून नागरिकांनी खांबाला बांधून बेदम मारहाण केली आहे.
यासंदर्भात स्पष्टीकरण देताना एस पी आनंदकुमार म्हणाले, संशयास्पदरित्या वावरणाऱ्या व्यक्ती आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी. पोलीस विभागाने जनजागृती करूनही अशा पद्धतीने नागरिक हल्ले करत असल्याच्या घटना वाढत असल्याचे नदिशनात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यभरात मुले पळविणाऱ्या टोळ्यांच्या अफवा पसरल्या असून विजापूर मध्ये याच अफवेच्या माध्यमातून हा प्रकार घडला आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस विभागाने गस्त देखील वाढवली असून नागरिकांना अशापद्धतीच्या काही शंका असल्यास त्यांनी तातडीने पोलिसाना माहिती द्यावी, दाट लोकवस्ती असलेल्या ठिकाणी मूल चोरी करण्याची शक्यता कमी असून याप्रकरणी कोणीही घाबरू नये, आपत्कालीन परिस्थितीत ११२ क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले आहे.


Recent Comments