Khanapur

खानापूर सरकारी रुग्णालयात जागतिक हृदय दिन

Share

जागतिक हृदय दिनाच्या निमित्ताने आज खानापूर सरकारी रुग्णालयात हृदयाशी निगडित जनजागृती कार्यक्रम आयोजिनात आला होता.

या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सईदा सिद्दीकी यांच्याहस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यानंतर डॉ. श्रेयश यांनी व्यायामाच्या पद्धती दाखविल्या. हृदयाशी निगडित माहिती देऊन आपले आरोग्य कसे मजबूत ठेवावे आणि दैनंदिन जीवनात हृदयाची काळजी कशी घ्यावी याबद्दल मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमास तालुका आरोग्याधिकारी डॉ. संजय नांद्रे, बालरोगतज्ज्ञ डॉ. पवन पुजारी, डॉ. वेणुगोपाल, डॉ. नागभूषण, कर्मचारी श्रीधर आदींसह एनसीडी विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

Tags:

heart day khanapur hospital khanapur hospital heart day