हासनच्या अरसीकेरेमध्ये खासदार प्रज्वल रेवण्णा आणि प्रीतम गौडा यांच्यात पुन्हा शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. आमच्या वडिलांनीच प्रीतम गौडा यांच्या वडिलांना बीबीएमपी दाखवली. त्यांच्या वडिलांनी बीबीएमपीत चांगला पैसे केला. या पैशावर आता हासनमध्ये माज करत असल्याचा हल्लाबोल खासदार प्रज्वल रेवण्णा यांनी केला आहे.
खासदार प्रज्वल रेवण्णा यांनी हासन जिल्ह्यातील अरसीकेरे येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, मी कोणाचे पाय पकडून खासदार झालो नाही, मी लोकांची मने जिंकली आहेत. आधी त्यांनी 2023 मध्ये जिंकणार का हे पहावे आणि मग त्यांनी हवेतर माझ्या विरोधात निवडणूक लढवावी असे खुले आव्हान प्रीतम गौडा यांना दिले. प्रीतम गौडा यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव होणार हे नक्की आहे. हवे तर प्रीतम गौडा यांनी माझ्याविरोधात खासदारकीची निवडणूक लढवावी, असे आव्हान त्यांनी दिले आहे.
दरम्यान, पुढे बोलताना प्रज्वल रेवण्णा म्हणाले, यावेळी मोठी रक्कम मिळवून तो बंगळूरला जाणार आहे, त्याचे वडील म्हैसूर गावात इंजिनियर होते. त्यावेळी रेवण्णांचे हातपाय धरल्याने त्यांना बीबीएमपी दाखवली. त्यांच्या वडिलांनी मुलांना संभाळल्याने आज तो हासनमध्ये उडत आहे. आधी त्यांनी आमच्या कुटुंबाचे उपकार लक्षात ठेवावेत असे सुनावले.


Recent Comments