Belagavi

बेळगावच्या तरुण पैलवानाचा धारवाडमध्ये हृदयविकाराने मृत्यू

Share

मॉर्निंग वॉक करून घरी परतत असताना एका तरुण पैलवानाचा हृदयविकाराचा झटका येऊन जागीच मृत्यू झाल्याची घटना धारवाड येथे घडली आहे. हे दृश्य सीसी कॅमेऱ्यात चित्रित झाले आहे.

बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगाल तालुक्यातील दोडवाड गावातील पैलवान संगप्पा बळीगेर (२८) हे कुस्तीपटू आहेत. ते मूळचे बेळगाव जिल्ह्यातील असले तरी ते धारवाड येथे स्थायिक झाले आहेत.

 

आज सकाळी धारवाडमधील मडीहाळजवळ मित्रासोबत फिरत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे ते जमिनीवर कोसळले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. दोडवाड या त्यांच्या मूळ गावात त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती मृताच्या कुटुंबीयांनी दिली आहे.

Tags:

pailwan death