Kagawad

भाजप धर्मविरोधी नाही तर देशद्रोहीविरोधी : नलीनकुमार कटील

Share

कागवाड तालुक्यातील केंपवाड आणि मदभावी येथे आज भाजप प्रदेशाध्यक्ष नलीनकुमार कटील यांनी पत्रकार परिषद घेऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी राज्यात आणि देशात भाजप सरकारने हाती घेतलेल्या उपक्रमांची, प्रकल्पांची माहिती दिली.

केंपवाड येथील साखर कारखान्यात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना नलीनकुमार कटील म्हणाले, भाजप पक्ष कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही तर देशद्रोही कारवाया करणाऱ्या संघटनेच्या विरोधात आहे. यासाठी अशा संघटनांवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखालील सरकारने देशाला उत्कृष्ट प्रशासन दिले आहे. जवळपास २०० नवनवे प्रकल्प राबविण्यात आले असून याचा फायदा प्रत्येक घरोघरी झाला आहे.

यावेळी कागवाड मतदार संघातील केंपवाड आणि मदभावी येथे झालेल्या सभेत त्यांनी हजारो कार्यकर्त्यांशी संवाद साधत भाजप सरकारने राज्यात आणि देशात मंजूर केलेल्या प्रकल्पांची माहिती दिली. तसेच सर्व प्रकल्प प्रत्येकाच्या दारापर्यंत पोहोचतील अशी ग्वाही दिली. नलीनकुमार कटील पुढे म्हणाले, देशातील दहशतवादी संघटनांवर बंदी घालणे हि चांगली गोष्ट आहे. दहशतवादी संघटना किंवा दहशतवाद्यांना कोणताही पक्ष किंवा जात नसते. अशा दहशतवाद्यांना आला घालणे हि बाब चांगली असल्याचे ते म्हणाले.

यावेळी माजी मुख्यमंत्री सिद्धराम्मय्या यांनाही टोला लगावत सोनिया गांधींना ५ वर्षे पैसे देऊन त्यांनी मुख्यमंत्रीपद उपभोगले अशी टीकाही केली. सिद्धरामय्या हे कमिशन तत्वावर काम करणारे असून त्यांनी याच तत्वावर काँग्रेस पक्षातून सत्ता केली असा आरोप नलीनकुमार कटील यांनी केला. यावेळी कागवाड मतदारसंघाचे आमदार श्रीमंत पाटील यांच्या विशेष सेवेबद्दल नलीनकुमार कटील यांनी कौतुक केले. यावेळी माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी, खासदार अण्णासाहेब जोल्ले, अथणीचे आमदार महेश कुमठळ्ळी यांच्यासह पक्षातील ज्येष्ठ नेते, मान्यवर आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags:

kagawad naleenkumar kathil