खानापूर तालुका सार्वजनिक रुग्णालयात आज जागतिक रेबीज दिन साजरा करण्यात आला. यावेळी रेबीजबद्दल लोकांना जागरुक करण्यात आले.

यावेळी जिल्हा सांसर्गिक रोग निरीक्षक डॉ. बी. एन. तुक्कार म्हणाले की, रेबीज हा प्रादुर्भाव झालेल्या जनावरांमुळे पसरणारा आजार असून लस देऊन त्यावर नियंत्रण मिळवता येते. त्यामुळे कुत्रा चावल्यानंतर गावठी उपचार करण्याऐवजी सरकारी दवाखान्यात, प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन संबंधितांनी इंजेक्शन आणि योग्य औषोधोपचार घ्यावेत असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संजय नांद्रे, बालरोग तज्ज्ञ डॉ. पवन पुजारी, खानापूर तालुक्यातील शिक्षक व रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते.


Recent Comments