काँग्रेस राज्यात तीन भागात विभागली गेली आहे. सिद्धरामय्या, डीके आणि खर्गे-शामनूर अशा तीन तुकड्यात तीन दिशांना गेली आहे अशी घणाघाती टीका जलसिंचन मंत्री गोविंद कारजोळ यांनी केली.
विजापूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना मंत्री गोविंद कारजोळ म्हणाले की, काँग्रेस तीन दिशेने जात आहे, काँग्रेस सत्ता मिळविण्याचे दिवास्वप्न पाहत आहे. सिद्धरामय्या या आयुष्यात मुख्यमंत्री होणार नाहीत, असे भाकीत त्यांनी केले. सिद्धरामय्या यांना वाटत होते की ते आधीच मुख्यमंत्री आहेत. हे दिवास्वप्न आहे. सिद्धरामय्या हे अपघाती मुख्यमंत्री आहेत. काँग्रेसचे नेते भ्रष्टाचार करून तुरुंगात गेले आणि आता पळत आहेत. भ्रष्टाचाराबाबत बोलण्याची नैतिकता त्यांच्यात नाही, अशी टीका त्यांनी केली.
दरम्यान, कंत्राटदार संघटनेच्या केम्पण्णा यांच्या, 40% कमिशनच्या आरोपाला उत्तर देताना मंत्री गोविंद कारजोळ यांनी, त्यांना लोकायुक्तांकडे अर्ज करण्याचे आव्हान दिले. केम्पण्णा हे कंत्राटदार नाहीत, काँग्रेसच्या एका नेत्याच्या घरी बसून त्यांनी अर्ज लिहिला आहे. केंपण्णा, त्यांना पाठीशी घालणारे ठेकेदार कोणते काम करतात. या कामासाठी कोणाला लाच दिली आहे, याचा खुलासा व्हायला हवा. केम्पण्णा यांना लोकायुक्तांकडे तक्रार करण्याचे आव्हान मंत्री गोविंद कारजोळ यांनी दिले.


Recent Comments