निपाणी तालुक्यातील बोरगाव शहरातील बोरगाव-इचलकरंजी रस्त्यावर दुचाकी आणि मॅक्सीकॅब यांच्यात झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला.

रामा कृष्णा सनदी (३२) असे मृत तरुणाचे नाव आहे. रामा काम आटोपून इचलकरंजीहून बोरगावकडे घरी परतत असताना एका मॅक्सिकॅब लॉरीची त्याच्या दुचाकीला जोरदार धडक बसली. या दुर्घटनेत तो जागीच ठार झाला.
डीवायएसपी बसवराज यलीगार, सदलगा पी. एस. आय. एच. भरतगौडा यांनी भेट देऊन पाहणी केली. अपघात घडताच लॉरी चालक फरार झाला.याप्रकरणी सदलगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.


Recent Comments