बेळगावमधील कन्नड साहित्य भवन येथे नाडहब्ब उत्सवानिमित्त सुरु असलेल्या कार्यक्रमाच्या दुसरे दिवशी विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
९५ वर्षांपासून सुरु असलेल्या या कार्यक्रमात मंगळवारी विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कन्नड साहित्य भवन प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात कर्नाटकात इतिहास घडविणाऱ्या वीर महिला या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
कारंजी मठाचे गुरुसिद्ध महास्वामी यांच्या दिव्य सानिध्यात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात कित्तूर येथील सरकारी महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रज्ञा मत्तीहळ्ळी, आरपीडी महाविद्यालयाच्या निवृत्त प्राचार्या डॉ. स्मिता सुरेबानकर, लेखिका ज्योती बदामी, एम एन आर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. निर्मला बच्चल, साहित्यिक य रु पाटील यांनी व्याख्यान दिले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कन्नड साहित्य परिषदेच्या जिल्हाध्यक्षा मंगला मेटगुड्ड या होत्या.
यावेळी बोलताना डॉ. स्मिता सुरेबानकर यांनी राणी चन्नभैरादेवी यांनी पोर्तुगीजांविरोधात दिलेल्या लढ्याची माहिती दिली. पोर्तुगीज आणि आदिलशाही यांच्याविरोधात लढताना संपूर्ण सैन्याचे नेतृत्व राणी चन्नभैरादेवी यांनी केले अशी माहिती त्यांनी दिली.
यावेळी गुरुसिद्ध महास्वामींनीही विचार व्यक्त केले. राज्यातील अशा वीर मलांच्या जीवनावर आधारित कार्यक्रम सातत्याने आयोजित केले जावेत असा सल्ला देत दसरा महोत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण स्त्रीशक्तीचा सन्मान या कार्यक्रमांतर्गत होत असल्याचेही स्वामीजींनी सांगितले.
यावेळी कोण्णूर येथील जयकिसान सांस्कृतिक आणि जानपद कला संघाचा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात रसिक श्रोत्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता.


Recent Comments