Belagavi

पीएफआयच्या 7 कार्यकर्त्यांना बेळगावात अटक; हिंडलगा कारागृहात रवानगी

Share

राष्ट्रीय तपास यंत्रणेने पीएफआय आणि एसडीपीआय पदाधिकाऱ्यांच्या घरांवर टाकलेल्या छाप्यांच्या निषेधार्थ बेळगावात आंदोलन केलेल्या पीएफआयच्या 7 कार्यकर्त्यांना बेळगाव पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यावर सीआरपीसी कलम 110 अन्वये गुन्हा नोंदवून त्यांची रवानगी हिंडलगा कारागृहात करण्यात आली आहे.


बेळगावातील आझम नगरचे रहिवासी आणि पीएफआयचे माजी जिल्हाध्यक्ष झकीउल्ला फैजी, आसदखान सोसायटी कॉलनी रहिवासी एसडीपीआयचे जिलाध्यक्ष अबीदखान कडोली व बद्रुद्दीन पटेल, शिवाजीनगरचे रहिवासी सलाउद्दीन खिळेवाले, अमन नगरचे रहिवासी समीउल्ला पिरजादे, बॉक्साईट रोडचे रहिवासी जाहीर घीवाले आणि विद्यागिरीचे रहिवासी रेहान अजीज अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी त्यांचे मोबाईल जप्त करून त्यातील माहिती घेत आहेत. त्यांची सोशल मीडियावरील अकाउंट्स, पीएफआय,एसडीपीआयमध्ये सहभागी झाल्यापासून त्यांनी कायकाय उद्योग केले, त्यांच्यावर याआधी कोणते आरोप होते का? आदी मुद्यांवर माहिती घेण्यात पोलीस व्यग्र आहेत.

त्यांच्याकडून समाजातील शांतता बिघडू नये यासाठी त्यांना प्रतिबंधात्मक अटक करण्यात आली आहे. ताब्यात घेतल्यानंतर या 7 जणांची वंटमुरी प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर कडक सुरक्षा व्यवस्थेत त्यांना हिंडलगा तुरुंगात हलविण्यात आले. यावेळी अटक केलेल्या एकाने भारतात मुस्लिम आणि दलितांवर अन्याय होत असल्याच्या घोषणा दिल्या.

Tags:

belgaum hindalga pfi sdpi